स्वतंत्र भारतामध्ये राहताना आपल्याला आचार, विचार, धर्म, परंपरा, आहार यांची निवड करण्याच आणि ते फॉलो करण्याच स्वातंत्र्य भारतीय राज्य घटनेन दिल आहे . कोणतही सरकार आपल्यावर आहाराविषयीची सक्ती करू शकत नाही .
पण यावेळी जैन समाजाच्या पर्युषण या धार्मिक काळामध्ये सरकारने मुंबई मधील काही भागांमध्ये मांस मच्छी विक्री करणाऱ्या दुकानांना बंद राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याला काही मराठी संघटना राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. अगदी त्या राजकीय पक्षांनी थेट मांस विक्री स्टोल वगैरे लावून निषेध नोंदवला . त्या बद्दल सरकार ने स्पष्टीकरण दिल कि तो नियम २००४ पासून अस्तित्वात आहे . याआधी आंदोलन का झाली नाहीत .
अशाप्रकारची बंदी असता कामा नये . आपण आपले विचार आचार एखाद्यावर जबरदस्तीने थोपण्यासारख हे काम आहे, जर एखाद्या निर्णयाला बहुसंख्य जनतेचा विरोध असेल तो त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणारा असेल तर जरी तो आधीच्या सरकारचा निर्णय असेल तर सरकारने तो बदलावा .
महाराष्ट्रातील इतर भागातील जैन समाजाने अशी मागणी केल्याचे कधी ऐकिवात नाही . या बंदिमागे मुंबई आणि परिसरातील गुजराती जैन समाजाचा दबावगट असल्याच जाणवत आहे . पैशाच्या जोरावर इतर लोकांवर वर्चस्व गाजवण्याची मनोवृत्ती यामागे असल्याचा भास होतो . लोकांना शाकाहारा साठी प्रोत्साहित करण वेगळ आणि त्यांच्यावर तो थोपण या वेगळ्या गोष्टी आहेत . अशाप्रकारची बंदी असू नये अशीच बहुसंख्य लोकांची मागणी आहे इच्छा आहे.
( गेल्या काही कालावधीपासून काही आहारविषयक पुस्तक वाचून म्हणा किंवा काही शाकाहारी जैन मित्रांच्या संगतीन म्हणा मी शाकाहारी झालो आहे मांसाहार घेण बंद केल आहे )

पाणी नक्की कुठे मुरतय !!!!!!!!!!! ते पहायला हव.
ReplyDelete