badge

Thursday, September 17, 2015

मिट बॅन

स्वतंत्र भारतामध्ये राहताना आपल्याला आचार, विचार, धर्म, परंपरा, आहार यांची निवड करण्याच आणि ते फॉलो करण्याच स्वातंत्र्य भारतीय राज्य घटनेन दिल आहे .  कोणतही सरकार आपल्यावर आहाराविषयीची सक्ती करू शकत नाही .

पण यावेळी जैन समाजाच्या पर्युषण या धार्मिक काळामध्ये सरकारने मुंबई मधील काही भागांमध्ये मांस मच्छी विक्री करणाऱ्या दुकानांना बंद राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याला काही मराठी संघटना राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. अगदी त्या राजकीय पक्षांनी थेट मांस विक्री स्टोल वगैरे लावून निषेध  नोंदवला . त्या बद्दल सरकार ने स्पष्टीकरण दिल कि तो नियम २००४ पासून अस्तित्वात आहे . याआधी आंदोलन का झाली नाहीत .

अशाप्रकारची बंदी असता कामा नये . आपण आपले विचार आचार एखाद्यावर जबरदस्तीने थोपण्यासारख हे काम आहे, जर एखाद्या निर्णयाला बहुसंख्य जनतेचा विरोध असेल तो त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणारा असेल तर जरी तो  आधीच्या सरकारचा निर्णय असेल तर  सरकारने तो बदलावा .                                  

महाराष्ट्रातील इतर भागातील जैन समाजाने अशी मागणी केल्याचे कधी ऐकिवात नाही . या बंदिमागे मुंबई आणि परिसरातील गुजराती जैन समाजाचा दबावगट असल्याच जाणवत आहे . पैशाच्या जोरावर इतर लोकांवर वर्चस्व गाजवण्याची मनोवृत्ती यामागे असल्याचा भास होतो . लोकांना शाकाहारा साठी प्रोत्साहित करण वेगळ आणि त्यांच्यावर तो थोपण या वेगळ्या गोष्टी आहेत . अशाप्रकारची बंदी असू नये अशीच बहुसंख्य लोकांची मागणी आहे इच्छा आहे.


      ( गेल्या काही कालावधीपासून काही आहारविषयक पुस्तक वाचून म्हणा किंवा काही शाकाहारी जैन मित्रांच्या संगतीन म्हणा मी शाकाहारी झालो आहे मांसाहार घेण बंद केल आहे ) 

Friday, August 21, 2015

महाराष्ट्रभुषण


                                                               गेला महिना दोन महिने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून जी वातावरण निर्मिती केली गेली त्याविषयी थोड व्यक्त व्हावं अस वाटत  . 
                                ज्याला जो लेखक आवडतो त्याने त्या लेखकाची पुस्तके वाचावीत आम्हाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहिलेला इतिहास आवडतो आम्ही तोच वाचणार आणि तोच फॉलो करणार , आणि कुणाला इतर लेखकांचा इतिहास आवडत असेल तर त्यांनी तो वाचवा तो फॉलो करावा , शेवटी हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे .
                                  बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रात शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांची बदनामी केल्याचा जो आक्षेप घेतला जातो तो साफ चुकीचा आहे .
                                                              जो ग्रंथ गेली पन्नास वर्ष अस्तित्वात आहे त्या ग्रंथांमध्ये बदनामी झाल्याच गेल्या १० वर्षातच कस लक्षात आल ? याआधी ज्या लाखो लोकांनी ते पुस्तक / ग्रंथ विकत घेऊन वाचल त्यातल्या एखाद्या सामान्य वाचकाच्या मनात अशा शंका का आल्या नाहीत ?
आपल्याला जर कावीळ झाली असेल तर आपल्याला सगळ जग पिवळ दिसायला लागत तसच हे आरोप करणाऱ्या लोकांना जातीयवादाची कावीळ झाली आहे .
                                                          आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र सरकारकड पुरस्कार मागायला गेले नव्हते . महाराष्ट्र सरकारने तो जाहीर केला आणि दिला , त्यामुळ आता या वादावर पडदा टाकणे आवश्यक आहे .