गेला महिना दोन महिने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून जी वातावरण निर्मिती केली गेली त्याविषयी थोड व्यक्त व्हावं अस वाटत .
ज्याला जो लेखक
आवडतो त्याने त्या
लेखकाची पुस्तके वाचावीत आम्हाला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि
पानिपतकार विश्वास पाटील यांनी
लिहिलेला इतिहास आवडतो आम्ही
तोच वाचणार आणि
तोच फॉलो करणार
, आणि कुणाला इतर
लेखकांचा इतिहास आवडत असेल
तर त्यांनी तो
वाचवा तो फॉलो
करावा , शेवटी हा ज्याच्या
त्याच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न
आहे .
बाबासाहेब पुरंदरे यांनी
शिवचरित्रात शिवाजी महाराज आणि
राजमाता जिजाऊ साहेब यांची
बदनामी केल्याचा जो आक्षेप
घेतला जातो तो
साफ चुकीचा आहे
.
जो ग्रंथ गेली पन्नास
वर्ष अस्तित्वात आहे
त्या ग्रंथांमध्ये बदनामी
झाल्याच गेल्या १० वर्षातच
कस लक्षात आल
? याआधी ज्या लाखो
लोकांनी ते पुस्तक
/ ग्रंथ विकत घेऊन
वाचल त्यातल्या एखाद्या
सामान्य वाचकाच्या मनात अशा
शंका का आल्या
नाहीत ?
आपल्याला जर कावीळ
झाली असेल तर
आपल्याला सगळ जग
पिवळ दिसायला लागत
तसच हे आरोप
करणाऱ्या लोकांना जातीयवादाची कावीळ
झाली आहे .
आणि शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र
सरकारकड पुरस्कार मागायला गेले
नव्हते . महाराष्ट्र सरकारने तो
जाहीर केला आणि
दिला , त्यामुळ आता या
वादावर पडदा टाकणे
आवश्यक आहे .

निलेश तुम्ही चालु केलेल्या ब्लाँगला प्रथम लाख लाख शुभेच्छा. डोळ्यांवरील जातीयतेच झापड जो पर्यत बाजुला होणार नाही तोपर्यंत माणसा माणसा मधील अंतर कमी होणार नाही. आणि ज्यावेळी असा बंधुभाव आपल्या देशात नांदेल तो आपल्यासाठी सुदिन असेल. वैचारिक वाद असावे पण ते विचारानेच लढावे. वैराने वैर वाढेल आणी प्रेमाने प्रेम. प्रेम वाढवुन देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करु आणी आपला देश एकसंध बनवू. धन्यवाद..
ReplyDeleteआक्षेप १)
ReplyDelete"मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत." (पान ८३) असे सांगुन या विधानावर सर्वात जास्त प्रक्षोभ व्यक्त केला जातो. हे विधान देतांना पुढील संदर्भ दिला जातो.(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) संदर्भासठी खालील लिंक देत आहे. http://babapurandare.blogspot.in/2010/09/blog-post.html http://vishvamarathi.blogspot.in/2012/06/blog-post_28.html
सर्चमद्ध्ये अनेक मिळतात. अनंत दारवटकरांनी न्यायालयात विचारलेल्या प्रश्नावर पुरंदरे निरुत्तर झाले असेही सांगितले जाते.
माझ्याकडील आवृत्ती २००१ मधील आहे. १४ वर्ष जुनी. या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ८३ वरच नेमके काय म्हटले आहे हे पाहुयात:
"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"
दोन्ही उद्घ्रुते शांतपणे पडताळुन पहा. पुरंदरेंच्या पुस्तकात या विधानात मुळात ’मराठा’ शब्दच नाही हे सहज लक्षात येईल. हा शब्द कोठुन आणला? हे विधान करतांना लेखकाने तत्कालीन महाराष्ट्रातील अनागोंदी चितारत हे विधान केले आहे हे सलग वाचले तर स्पष्ट दिसते. सरदार-जहागिरदार फक्त मराठा होते कि काय? मुरारपंत जोगदेव सरदार नव्हता काय? तो कोण होता? वरील विधान सरसकट सर्वच महाराष्ट्री जहागिरदार-सरदारांबाबत आहे, त्यात ब्राह्मणाला सुटका दिली आहे असे दिसते आहे काय?
दुसरे महत्वाचे असे कि पुरंदरेंनी मराठा हा शब्द पुस्तकात मराठी माणुस म्हणुन वापरला आहे. जात म्हणून नाही. जेथे जेथे जात अनुस्युत आहे तेथे काय म्हटले आहे तेही पाहुयात:
"क्षत्रीय मराठ्यांच्या तलवारी आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लेखण्या सुलतानांच्या सेवेंत दासींबटकींच्या अदबीने आणी नेकीने रमल्या होत्या." (पान ५५). विधान स्वयंस्पष्ट आहे. येथे मराठा जातीचा जसा उल्लेख आहे तसेच ब्राह्मणांचाही आहे. अन्यत्र मराठा जात ही कुळवंत अथवा शहाण्णव कुळी या विशेषणासहित उल्लेखली आहे. दोहोंना सारखेच झोडपले आहे असे स्पष्ट दिसेल.
मराठा जातीविषयी येणारा अजुन एक उल्लेख पहा, : "आणि या मंडळींना ओळखलत का? हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती.........पण काय लिहायचे आता?" (पान ३५८)
ही हतबुद्धता संतापाच्या रुपाने कोठे उमटली तर लेखकाला दोष द्यायचा कि परिस्थितीला? महाराजांपेक्षा या अशा "९६ कुळी म-हाटे" (हा पुरंदरेंचा या संदर्भातच पुढच्याच परिच्छेदांत येणारा शब्द), त्यातही निकटच्या नातेवाईक मंडळीला शाइस्तेखान जवळचा वाटला आणि त्याला जाऊन मिळाले. हे वास्तव नसेल तर पुराव्यांनीच खोडले पाहिजे. पण या विधानाबाबत कोणी आक्षेपच घेतल्याचे वाचनात नसल्याने हे विधान सर्वमान्य आहे असा अर्थ सहज घेता येइल.
आक्षेप २) " शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... " हे विधान आक्षेपार्ह मानले गेले आहे कारण यातील "कुजबुज" हा शब्द आणि हे लग्न पंतांनी हौसेने केले, म्हणजे शहाजीराजांना डावलले. एक चाकर शहाजीराजांपेक्षा मोठा झाला का असा हा आक्षेप आहे.
ReplyDeleteयाला जोडुनच दुसरा आक्षेप या विधानावर... "आईसाहेबांवर ते फार माया करीत. ही बाई अशी तशी नाही, हिची जडणघडण कांही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता..........पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. गोत्र? - गोत्र शांडिल्य. पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे शिवबांचे गोत्र एकच होते-सह्याद्रि! प्रचंड अवघड सह्याद्रि! पंत भारदस्त होते. जबरदस्त होते. सह्याद्रीसारखेच!" (पान १२६)
या विधानातील ’गोत्र’ एकच या शब्दावर आक्षेप आहे, तसेच ’ते फार माया करीत’ आणी ’शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता."
पण याच्याच आधी पान १२५ वर काय म्हटलेय तेही पाहुयात.
"राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरा-याचे, मायेचे आणि ममतेचे वडिलधारे पुरुष होते. ते सर्वांवर हक्काने रागवत अन हक्काने प्रेम करत." (पान १२५).
पुन्हा हा पाठचा संदर्भ असतांना हे वाक्य वाचुन काही ओळी (ज्यात सत्तर वर्षीय दादोजींच्या राजकीय अनुभवांबाबत सांगण्यात जातात.) गेल्यानंतर येणारे आक्षेपार्ह मानले जाणारे विधान पाहिले तर कोण सुज्ञ पुरुष ते आक्षेपार्ह मानेल? ’वडिलधारे’ या शब्दातच माया ममतेचा अर्थ सामावला आहे.
राहिले आता गोत्राचे. गोत्र ही वैदिक धर्मीय संकल्पना आहे. पुरंदरेही "उत्तरेत वैदिक धर्माचा, वैदिक राज्यांचा आणि वैदिक संस्कृतीचा हे सुलतान विध्वंस करत होते, त्याच काळात महाराष्ट्रांतले धर्ममार्तंड पोथ्या उलथ्यापालथ्या करत खल करत बसले होते." (पान २५) असे विधान करतात. या वाक्याला माझा आक्षेप नाही कारण वैदिक धर्म स्वतंत्र आहे, वेगळा आहे हे मी सांगतच आलो आहे. त्यांनी उत्तरेतील कोणाला वैदिक मानले हे मी सांगु शकत नाही कारण त्यांनी ते स्पष्टही केलेले नाही. पण तो येथे मुद्दा नसुन गोत्राचा आहे.
पुरंदरे उपमा-उत्प्रेक्षा पेरत लेखन करतात हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. गोत्र म्हणजे काय? शूद्र वगळता सर्वांना (तीन वर्णांना) गोत्र असते. गोत्र म्हणजे ऋग्वेद रचना करणा-या ऋषींचे थेट वंशज. रक्तसंबंधी. महाभारत काळात गोत्रे फक्त चार होती. ती म्हणजे अंगिरस, कश्यप, भृगू आणि वशिष्ठ. नंतर ती आठ बनली. त्यांच्याच वंशांत गोत्रकर्ते ऋषी झाल्याने ही संख्या आता चारशेच्या पुढे गेली आहे. ही का संख्या वाढली त्याचे उत्तर मी अन्यत्र दिलेले आहे.
पुरंदरे यांनीच जाणून बुजून शिवरायांच्या जन्मतारखेचा वाद निर्माण केला. बदनामी करणा-या प्रत्येकाचा निषेध !
ReplyDelete